महाराष्ट्र

महाशिवरात्रीनिमित्त अंधेरी येथे आयोजित आध्यात्मिक मेळ्याची ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री (मैने प्यार किया फेम) च्या हस्ते सर्टिफिकेट करण्यात आले प्रदान

अंधेरी पश्चिम    प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या विलेपार्ले सबझोनच्या वतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त 20 ते 27 फेब्रुवारी दरम्यान भव्य आध्यात्मिक मेळाव्याचे
महात्मा ज्योतिबा फुले ग्राउंड (प्रगती मैदान), डी एन नगर पोलीस स्टेशन समोर, अंधेरी पश्चिम येथे सकाळी 7 ते 12 आणि दुपारी 4 ते 9 या वेळेमध्ये आयोजन करण्यात आले आहे

सत्यम शिवम् सुंदरम् देवांचे देव महादेव ज्योतिर्बिंदु निराकार परमात्मा शिव यांचे विशेष पूजन आणि अभिषेक महाशिवरात्रीच्या दिवशी केला जातो. वास्तविक महाशिवरात्री हा सण का साजरा केला जातो? यामागील आध्यात्मिक रहस्य काय आहे? महादेवाच्या अवताराचे सूचक आहे का? महादेव या पृथ्वीवर कधी आणि कसे अवतरतात ? आपल्या सर्वांना अज्ञानाच्या गाढ झोपेतून कसे जागे करतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे या आध्यात्मिक मेळ्यातून मिळणार आहेत.

असे म्हणतात – ज्ञानाचा सूर्य उगवतो आणि अज्ञानाचा अंधार नष्ट होतो. परमपिता परमात्मा शिव पुन्हा एकदा प्रजापिता ब्रह्मा बाबा यांच्या माध्यम द्वारे या भारतभूमीवर अवतरले आहेत आणि ब्रह्मा कुमारी संस्थेच्या माध्यमातून सुवर्ण भारत घडवण्याचे उत्कृष्ट कार्य करत आहेत.

या आध्यात्मिक मेळ्यातील मुख्य आकर्षणे –
1-15 फूट नारळाचे शिवलिंग
2 – बारा ज्योतिर्लिंग दर्शन
3 – सुवर्ण भारत दर्शन
4 – चैतन्य देवीचे दर्शन
5 – कुंभकर्णाचे भव्य चलचित्र
६ – शांती अनुभूती ध्यान कुटीर
७ – मोफत वैद्यकीय शिबिर
8 – व्यसनमुक्ती स्टॉल
9 – नैतिक मूल्यावर आधारित खेळ
10 – अध्यात्मिक समुपदेशन स्टॉल

विशेष आध्यात्मिक प्रवचन मालिकेचे आयोजन
23, 24, 25 आणि 26 फेब्रुवारी 2025 संध्याकाळी 5-30 ते 6-30
या वेळेत या ठिकाणी करण्यात आले आहे तसेच
तीन दिवसीय मोफत राजयोग शिबिराचे आयोजन
21 ते 23 फेब्रुवारी 2025 आणि 24 ते 26 फेब्रुवारी 2025
सकाळी 7 ते 8 आणि संध्याकाळी 7 ते 8 या ठिकाणी कण्यात आले आहे

अशा या उपक्रमाची ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे
सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री (मैने प्यार किया फेम) व ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड्स चे उपाध्यक्ष डॉ दीपक हरके यांच्या हस्ते आयोजक विले पारले सब झोन च्या प्रमुख बी के योगिनी दीदी याना विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले .

प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय हि संस्था मानव आणि सामाजिक कल्याणासाठी समर्पित आध्यात्मिक संस्था आहे ज्याचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय माउंट आबू, राजस्थान येथे आहे. संस्थेची जगभरातील 140 हून अधिक देशांमध्ये 5000 हून अधिक राजयोग सेवा केंद्रे आहेत. अध्यात्मिक ज्ञान आणि राजयोगाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UNO) सार्वजनिक माहिती विभागात अशासकीय सदस्य म्हणून ही संस्था अमूल्य योगदान देत आहे. आणि ती आंतरराष्ट्रीय संस्था ECOSOC आणि UNICEF मध्ये सल्लागार म्हणून काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button