व्हॉइस ऑफ नांदेड सिटी विशाल फडतरे आणि गाथा सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावला

पुणे : व्हॉइस ऑफ नांदेड सिटी च्या सिनिअर ग्रुप मध्ये विशाल फडतरे तर जूनियर ग्रुप मध्ये गाथा सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावला. ब्रह्माकुमारी विद्यालय नांदेड सिटी आणि रेडिओ मधुबन द्वारे व्हॉइस ऑफ नांदेड सिटी चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये दीडशे गायकांनी भाग घेतला होता यामधून अंतिम फेरीसाठी सीनियर ग्रुप साठी चार आणि ज्युनिअर ग्रुप साठी चार जणांची निवड करण्यात आली होती आणि अंतिम फेरीचे आयोजन नांदेड सिटीच्या हॉलमध्ये करण्यात आले होते यावेळी हिंदी चित्रपटाचे गायक हरीश मोयल, फिल्म निर्देशक चांद मिश्रा , ब्रह्माकुमारी नलिनी दीदी , विकास दांगट ,प्रकाश गोरे ,नरसिंह लगड ,सुरजीत कारले, मोनाली शहा, आर जे रमेश भाई हे उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिल्वर स्कूलच्या वतीने गणेश वंदना , समूह गीत आणि शिवतांडव नृत्य सादर करण्यात आले तसेच हर्षदा साबणे आणि ग्रुप तर्फे नृत्य नाटिका सादर केली या कार्यक्रमासाठी डॉ. विकास कशागर , चित्रा देशपांडे, मधुवंती दांडेकर या संगीत क्षेत्रातल्या नामवंतांनी जज ची भूमिका अदा केली ब्रह्माकुमारी नलिनी दीदी यांनी उपस्थितांना आशीर्वाचन दिले तर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नांदेड सिटीतील विद्यालयाच्या प्रमुख ललिता दीदी यांनी सांगितले की नवनवीन कलाकारांना संधी मिळावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी के श्रीनिधी भाई यांनी केले.