डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचं स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.
शिक्षकांचे स्वागत फुलांचा वर्षाव करीत त्यांचे पूजन करून त्यांच्याच हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

पुणे : बोपोडी भागातील गोरगरीब कामगार वर्गांच्या मुलां मुलींची एकमेव लोकप्रिय शाळा म्हणून ओळख असणाऱ्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेच्या माझी विद्यार्थी 34 वर्षांनी एकत्रित येऊन शाळेला नवसंजीवन देण्याकारिता स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या स्नेह मेळाव्यात शाळेतील शिक्षक वर्ग , माजी विद्यार्थी यांनी खूप मोठी उपस्थिती दर्शवून एका अविस्मरणीय ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार झाले. 34 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यास उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडुन वहात होता तर काही जणांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्यात धन्यता मांनली. शिक्षकांचे स्वागत फुलांचा वर्षाव करीत त्यांचे पूजन करून त्यांच्याच हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
तसेच सध्या हयात नसलेल्या शिक्षक आणि विध्यार्थ्यांना श्रद्धांजली देण्यात आली. त्यानंतर सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीस उपस्थित असणारे शिक्षक महावीर कर्वे, डॉ. अजयकुमार लोळगे, सीताराम वाघ, डॉ. प्रफुल्लचंद्र चौधरी, रजनी कर्णे, रंजना टांकसाळे, रेहाना इनामदार मॅडम, इन्दिरा नागपुरे मॅडम, देविदास सरोदे, वाल्मिकी हजारे सर, उत्तम गीते सर कमलाकर पाटील सर या सर्वांचा पुणेरी पगडी, ज्ञानेश्वरी ग्रंथ, आणि शाल देऊन विध्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रत्येक शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी भूमिका बजावत आहे याचा आम्हाला आभिमान आहे. आपण दिलेल्या प्रेमामुळेच आम्ही मोठे झालो झालो कार्यक्रमाचे प्रास्ताविक त्रिवेणी बहिरट, सूत्रसंचालन गिरीश ननावरे, आणि आभार राजेश गाडेकर यांनी मानले. या स्नेह मेळाव्यास विशेष भूमिका बजावून मेळावा यशस्वी करण्यात स्मिता ढोकळे, सोलोमन शेंडगे, सिद्धार्थ केदारी, राजू जगताप, नितीन पोळेकर आणि विशेष सहकार्य अनिल गायकवाड,विजय सरोदे, कादिर शेख, प्रशान्त कालेकर, मोहन शितोळें, मोहन भोसले, नरेंद्र मुरकुटे, संभाजी आंग्रे, आशिष धनवडे, विजय तांबे, राजू भिंगारे इत्यादींनी केले.