राजयोगिनी बी के सुनंदा दीदी यांना सेवा रत्न पुरस्कार प्रदान

पुणे – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शांतीदूत परिवार व युनिटी हॉस्पिटल, औंध यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर व अवयवदान जनजागृती अभियान तसेच सेवा रत्न पुरस्कार २०२५ प्रदान सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १३ महिलांना “सेवा रत्न गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, शांतीदूत स्मरणिका व पुस्तक असे होते.
यामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ग्राम विकास प्रभागाच्या राष्ट्रीय समन्वयक व पुणे येथील जगदंबा भवन रिट्रीट सेंटर च्या संचालिका व मीरा सोसाइटी सब झोन इंचार्ज राजयोगिनी बी के सुनंदा दीदी यांना शांतीदूत
परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ. विद्याताई जाधव व भारती विद्यापीठ हॉस्पिटलच्या डायरेक्टर ऑपरेशन्स डॉ. अरुंधती पवार यांच्या हस्ते सेवारत्न पुरस्कार देण्यात आला.
त्यांच्या वतीने हा पुरस्कार बी के शीतल दीदी यांनी स्विकारला. यावेळी बी के अश्विनी दीदी व बी के डॉ दीपक हरके उपस्थित होते. त्यांच्या सह पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये गुंजनताई गोळे (दुधाई-अमरावती), डॉ. अरुंधती पवार, विश्वसुंदरी ईशा अग्रवाल, उषा म्हात्रे (पालघर), प्रा. मयुरी पाटील, डॉ. आशा राव (अहमदाबाद), डॉ. रिता शेटीया, सुप्रिया पाटील, रीना जाधव (मुंबई), रश्मीताई कांबळे, रत्ना दहिवेलकर व डॉ. सोनाली चव्हाण यांचा विजेत्यांमध्ये
समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून झाली. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महिलांच्या योगदानाचा गौरव करत समाजसेवेतील त्यांच्या कार्याचा गौरव केला.
या सेवाभावी उपक्रमासाठी युनिटी हॉस्पिटलचे डॉ. आशा काळे, डॉ. अमित काळे, डॉ. प्रिती अमित काळे व संपूर्ण हॉस्पिटल टीम यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच प्रसिद्ध गझलकार म. भ. चव्हाण यांनी विशेष गझल सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांतीदूत शीतल शेखे यांनी केले. यशस्वी आयोजनासाठी डॉ. विठ्ठल जाधव (IPS), सौ. तृषालीताई जाधव, डॉ. प्रीती दिलीप काळे, सौ. आरती घुले, सौ. मोनिका भोजकर, सौ. रोहिणी कोळेकर, सौ. विजया नागटिळक, सौ. सीमा ठुबे, विजय ठुबे, सुरेश सकपाळ, मधू चौधरी, महेश पाटील, प्रा. इंद्रजीत भोसले, तानाजी भोसले, तानाजी राठोड, संदीप जाधव (अहमदनगर), रमेश तांबाळे, मोहन बागमार, महेंद्र जूनवाने, राजेंद्र सो
नार व इतर स्नेही हितचिंतकांनी मोलाचे योगदान दिले.
संपूर्ण पुरस्कारार्थी व त्यांचे कुटुंबीय यांनी या सेवाकार्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.