राष्ट्रीय

पाच उच्च शिक्षित तरुणी तरीही घेतल्या संन्यास : ब्रह्माकुमारी जीवनाचा मार्ग स्वीकारला

हरियाणा  ;  हरियाणाची रुहानी, सुनीता, अंजू, धन वर्षा आणि उत्तर प्रदेशच्या सिद्धीने रविवारी संसाराचा त्याग केला आहे. या पाचही तरुणींनी ब्रह्मकुमारीचा मार्ग स्वीकारला आहे. सिरसा येथील हिसार रोडवरील ब्रह्मकुमारीज आनंद भवनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात या तरुणींनी शिवलिंगाला वरमाला घातली आणि आपलं जीवन ईश्वर सेवेसाठी समर्पित केलं. संपूर्ण आयुष्य ईश्वर आणि मानवतेच्या सेवेत घालण्याचा निर्धार या तरुणींनी केला आहे. विशेष म्हणजे या पाचही तरुणी  उच्चशिक्षित आहेत.

हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात राहणारी रुहानीने पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं आहे. सुनीता बीकॉम झालेली आहे. तर अंजू 12 वी पास आणि आयटीआयमध्ये डिप्लोमाधारक आहे. सिरसा येथील धनवर्षाने एमटेक केलंय. उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यातील तिलकवा गावातील सिद्धीने एमए केलं आहे. सिद्धी पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील झुनीर येथील ब्रह्मकुमारी आश्रमात कार्यरत आहे.

डोळ्यांची समस्या दूर झाली
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या पाचही तरुणी आता ब्रह्मकुमारीज म्हणून ओळखल्या जातील. रुहानीला सुरुवातीपासूनच अध्यात्माचा ओढा होता. मला अध्यात्माची गोडी होती. त्यामुळे मी शिकत असतानाच ब्रह्मकुमारीज आश्रमात जाऊ लागले. या ठिकाणी आल्यावर माझ्या डोळ्यांची समस्या दूर झाली. मी डोळे बरे व्हावेत म्हणून बरेच उपचार केले. पण त्याचा फायदा झाला नाही. पण केंद्राच्या संपर्कात आले. ध्यान सुरू केलं आणि त्याचा माझ्या डोळ्यांवर अत्यंत चांगला परिणाम झाला. माझी डोळ्यांची समस्या आपोआप दूर झाली, असं रुहानी म्हणते. ब्रह्मकुमारी अशा तयार होतात

ब्रह्मकुमारी होण्यासाठी संस्थेची एक प्रक्रिया आहे.

प्रक्रिया सर्वांना लागू होते. ज्यांना ब्रह्मकुमारीज व्हायचे आहे. त्यांना राजयोग मेडिटेशनचा कोर्स करावा लागतो. त्यानंतर सहा महिने नियमितपणे सत्संग आणि राजयोग ध्यानाचा अभ्यास करावा लागतो. नंतरच प्रभारी दीदीद्वारे सेवा केंद्रात राहण्याची परवानगी दिली जाते, असं संस्थेच्या प्रवक्त्याचं म्हणणं आहे. पाच वर्षापर्यंत सेवा केंद्रात राहिल्यावर संस्थेची गाईडलाईन आणि दिनचर्येचं पालन करायचं असतं. दीदींची वागणूक, स्वभाव, व्यवहार या गोष्टी पाहिल्या जातात. त्यानंतर ट्रायलसाठी मुख्यालय शांतिवनमध्ये माता-पिताच्या परवानगीचं पत्र पाठवलं जातं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button